परमवीर चक्र पुरस्कार| Param Vir Chakra

   ||परमवीर चक्र पुरस्कार ||

पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरविले जाते.


              परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आहे त्यातील 14 वीरांना तर तो म्हणून मरणोत्तर देण्यात आला आहे. तर अशा या परमवीर चक्र या सन्मानाबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
        परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे. कास्य धातु पासून बनवलेले छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडत जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्ये. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीरचक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे आहेत.

         परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन; परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोरकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतले. शिवाय भारतातील कला परंपरा चाही खूप अभ्यास केला. मराठी संस्कृत हिंदी या भाषा अस्खलितपणे बोलत असत.
      परमवीर सन्मान प्राप्त शूर वीर सैनिकांची नावे पुढील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेली आहे.


अ.क्र.

परमवीर सन्मान प्रप्तकर्ते

1.

मेजर सोमनाथ शर्मा

2.

लान्स नाईक करम सिंग

3.

लेफ्टनंट राम राघोबा राणे

4.

नाईक जदुनाथ सिंग

5.

हवालदार मेजर पीरू

6.

कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया

7.

मेजर धन सिंग थापा

8.

सुभेदार जोगिंदर सिंग

9.

मेजर शैतान सिंग

10.

मास्टर हवालदार अब्दुल हमीद

11.

कर्नल अर्देशिर बुरसोरजी तारापोर

12.

लान्स नाईक अल्बर्ट एक्का

13.

लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल

14.

मेजर होशियार सिंग

15.

नायब सुभेदार बाना सिंग

16.

मेजर रामस्वामी परमेश्वरन

17.

लेफ्टनंट मनोज कुमार पांडे

18.

ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव

19.

रायफल मॅन संजय कुमार

20.

कॅप्टन विक्रम बत्रा

21.

फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने